breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पर्यावरण अहवाल – 2024 मुख्य सभेत मंजूर;माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक

पुणे : पुणे महानगरपालिकेत आज झालेल्या मुख्य सभेत पर्यावरण अहवाल -2024 प्रसिद्ध करण्यात आलेला असून या अहवालातील ठराविक ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. पुणे शहरात जुलै- 2024 पर्यंत एकूण 38,63,849 नोंदणीकृत वाहने झाली आहेत. सन 2023 मध्ये 2,93,471 नवीन वाहनांची भर, तर सन 2022 मध्ये नवीन 2,54,907 वाहनांची भर. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 18073 आहे. तसेच BS6 वाहनांची नोंदणी 8 लक्ष 80 हजार आहे.
  2. PMPML च्या एकूण 1887 बसेस कायर्रत असून त्यांपैकी 1187 सी. एन. जी. व 473 इलेिक्ट्रक बस मिळून स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण1879 बसेस आहेत. स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण बस ताफ्याच्या 88% आहे. इलेिक्ट्रक व सी.एन.जी. बसेसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होत आहे.PMPML च्या 473 इलेक्ट्रिक बस मार्च 2024 पर्यंत  एकूण प्रवास 4 कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे व यामुळे अंदाजे 7000 टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे.
  3. हवा प्रदूषण मधील PM 10 व PM 2.5 या घटकांचे सन 2023 मध्ये पी.एम.10 चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर या ठिकाणी सर्वात जास्त नोंदविले गेले. वर्षभरातील 365 दिवसांपैकी एअर क्वालिटी इंडेक्स AQI हे PM 10 च्या बाबतीत1 दिवस POOR, 0 दिवस VERY POOR आणि PM 2.5 च्या बाबतीत 30 दिवस POOR, 1 दिवस VERY POOR होते.

.4. पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्साठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई- बर्ड  या वेबसाईटवरील  मॅपींग वरून पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक  263 प्रजाती, तर ARAI टेकडीवर 253, पाषाण तलाव परिसरात 236 प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत.

  1. शहरात प्रतिदिन तयार होणारा घनकचरा : 2100 ते 2200 मे.टन.

ओला कचरा 950 मे. टन:: यावर कंपोिस्टंग, बायोगॅस, बल्क वेस्ट जनरेटर, होम कम्पोिस्टंग, शेतकऱ्यामार्फत  जिरवला जाणारा कचरा.  ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) वापर वाहनांसाठी साठी  इंधन स्वरुपात वापरण्यास सुरुवात.

सुका कचरा 1200 मे. टन : सुका कचऱ्यावर RDF रीफ्युस डीराईव्ह्ड फ़ुएल, MRF- मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचरा वेचकां माफर्त रिसायकल, सिमेंट कंपनीस थेट वापर.

पुणे शहरातील विविध ठिकाणी कायर्रत कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये 100% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. उरुळी फुरसुंगी कचरा डेपो येथे बफर झोन अमृत वन अंतर्गत  30000  वृक्षांची  लागवड केली आहे.

6 . सन 2023 मध्ये स्मशानभूमी मध्ये सरासरी 36% विद्युत दाहिनी ,20% गॅस दाहिनी व 44% लाकूड चा वापर करण्यात आला. 56% नागरिकांची पर्यावरण पूरक विद्युत व गॅस दाहिनी वापरण्याकडे कल.

  1. पुणे शहराची उर्जेची मागणी सर्वात जास्त रहिवासी भागात 46,74,348 kW होती , तर त्या खालोखाल खालोखालव्या व्यावसायिक व औद्योगिक भागांत आहे. मागील 5 वर्षांमध्ये ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून सन 2018-19 मध्ये एकूण 6025508 kW पासून सन 2022-23 मध्ये 7711532 kW झाला आहे, म्हणजेच सदर वाढ हि 27.98% आहे.

हेही वाचा –  ‘आयटी हब’मुळे जगाच्या नकाशावर आलेली हिंजवडी अन्‌ शरद पवार यांची दूरदृष्टी!

  1. पुणे शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने व्हावी यासाठी कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाउस गॅस व वातावरण बदल या विषयावर काम करण्यासाठी व पुणे शहर कार्बन न्युट्रल करण्याच्या दृष्टीने शहराचा क्लायमेट अँक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांत सौर ऊर्जेच्य वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सन 2018-19 मध्ये सौरऊर्जेचा सॅक्शन लोड 24614 kW होता व सन 2022-23 मध्ये वाढून 79618 kW आहे. मागील पाच वर्षांत मोठी वाढ दिसून येत आहे.

9 पुणे शहरामध्ये सन 2023 मध्ये एकूण 563.70 मी.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक तापमान 41 डिग्री सेल्सियस तर सर्वात कमी तापमान 7.4 डिग्री सेल्सियस होते.

  1. आय. जी. बी. सी. ग्रीन सिटी रेटिंग सिस्टीम अंतर्गत पुणे शहराला प्लॅटीनम रेटिंग प्राप्त झाले. शहराचा हरित विकास, ग्रीन बिल्डिंग, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची उपलब्धता , पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक बस चा वापर इ. पर्यावरण संवर्धन संबंधी केलेल्या कामासाठी प्लॅटीनम रेटिंग असलेले महाराष्ट्रातील प्रथम व भारतातील दुसरे शहर झाले आहे.

11 . माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

  1. पर्यावरण जागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम. प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा-2023

, पुणे प्लॉगेथॉन 2023 मेगा ड्राइव्ह’, 3 जून 2023 जागतिक सायकल दिन,  पर्यावरण साप्ताह, क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज, वन्यजीव सप्ताह इ.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button