Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार महेश लांडगे

असंघटित कामगार मेळावा उत्साहात, कष्टकरी महिला आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी – कष्टकरी आणि असंघटित कामगारांचे प्रश्न व समस्या आहेत याला शासकीय स्तरावर सोडवण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार. असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने आयोजित केलेला असंघटीत कामगार मेळावा चिंचवड येथे पार पडला. मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांचे हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते होते. यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, उद्योजक कार्तिक लांडगे, स्वीकृत सदस्य जितेंद्र पवार, डॉ गणेश अंबिके, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ संकेत जैन,सूरज भंडारे,डॉ सरोज अंबीके , पांडुरंग साने , विनायक मोरे आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील मजूर, कष्टकरी कामगार , बांधकाम कामगार, फेरीवाला, घरकामगार, रिक्षा चालक , आदिंसह कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते.
आमदार लांडगे पुढे म्हणाले कि, शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे हे असंघटित कामगार करत असून विकासात त्यांचा हातभार आहे त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, या कामगारांचे प्रश्न आरोग्य , सुरक्षा, वेतन आदी मुद्दे घेउन येत्या अधिवेशनात मांडनार आहे , तसेच फेरीवाला घटकाला लवकर कसा न्याय देता येइल यासाठी प्रयत्न करणार आहे. नेता कोणत्याही संघटनेचा , पक्षाचा असो पण जो समस्या मार्गी लावणारा आहे त्याच्या पाठीशी उभे रहा. काशिनाथ नखाते हे तुमच्या हक्कासाठी अविरत लढा देणारे आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. मी ही देखील त्यांच्या पाठीशी कायम राहील.
महापौर जाधव म्हणाले कष्टकरी, असंघटित कामगार, पथारीवाला ,घरकामगार, मजूर यांच्या समस्या आम्ही सोडविन्यासाठी कटिबद्ध आहोत. हातगाडी पथारीवाला हे स्वतः चा स्वयंरोजगार निर्माण करणारे आहे. त्याना बळ देने गरजेचे आहे , हॉकर्स झोन चा विषय लवकर मार्गी लाऊ तसेच कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्न करु.
नखाते म्हणाले कि, सन २००८ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा केला मात्र त्याची अमलबजावणी राज्य सरकारवर सोपवली आर्थिक निधी मुळे हा कायदा प्रत्यक्ष अंमलात आणला नाही ,असंघटित कामगारांचे प्रश्न गंभीर असून कामाच्या ठिकाणी त्यानां सुरक्षा साधने नसल्याने अनेक ठिकाणी अपघाती मृत्यु होत आहेत संबधित ठेकेदार हात झटकतो ,हे रोखले पाहिजे, घर कामगारंचा निधि अनेक दिवसांपासून रोखून ठेवला आहे ,ते सुरु व्हावे, असंघटितासाठी मुख्यमंत्र्यानी मागील अर्थसंकल्पात कामगारासाठी तरतूद केली मात्र राज्यात लागु झाले नाही, मनपाचे घरकुल योजनेत या कामगारांसाठी घरे राखीव ठेवावीत अशीही मागणी नखाते यानी केली.
यावेळी आदित्य बीर्ला मेमोरियल हॉस्पिटल व् मोरया सामाजिक प्रतिष्ठान च्या सहकार्याने कष्टकरी महिलां आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यात ३६० महिलांनी सहभाग घेतला. यावेळी कामगारांना शासकीय ओळखपत्रांचे व १ लाख रुपयाच्या मोफत विमा प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी महापौर राहुल जाधव व आमदार महेश लांडगे यांचे हस्ते करण्यात आले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी राजू बिराजदार, अनिल बारवकर, प्रकाश साळवे, साइनाथ खन्दीझोड़,सुरेश देड़े,मनीषा राउत, माधुरी जलमुल्वार ,धर्मेन्द्र पवार, तुकाराम माने , राजू जाधव, किशोर इंगळे, सुलोचना मिरपगारे, किरण सादेकर आदीनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले तर आभार मधुकर वाघ यानी मानले





