ताज्या घडामोडीमुंबई

‘वसमत’ हे देशातले पहिले हळद संशोधन केंद्र

जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प, केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी

मुंबई : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन दिले पाहीजे. त्यासाठी हळद लागवडीचे ‘क्लस्टर’ पद्धतीन उत्पादन करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे होत आहे, हळद उत्पादनामुळे मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हळद संशोधन केंद्राबाबत सह्याद्री अतिथी गृहात बुधवारी आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसमतच्या हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी आणि संशोधकांचे सुरुवातीला अभिनंदन केले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकीकृत हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे. या केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी दिले.

हळद लागवडीसाठी प्रोत्साहन द्या
हळदीचा वापर दैनंदिन जीवनात जेवणात रंग आणि चव येण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच हळद जंतूनाशक असल्याने औषध निर्मीतीसाठी देखील वापरली जात असते. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. हळदीच्या पिकास किड कमी प्रमाणात लागते, पाणी जास्त लागत नाही. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पिक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प
वसमत संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात 50 लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्म्या हळदीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाणार आहे, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होईल असे हळद केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button