breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली

मुंबई | सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. मात्र, हे पैसे कधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता स्वत: अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते अहमदनगरमध्ये पक्षाच्या सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, १ जुलै रोजी आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. मात्र, अनेक महिलांचे अर्ज आजही भरलेले नाहीत. त्यामुळे आपल्याला पैसे मिळतील की नाही, असा प्रश्न या महिलांच्या मनात आहे. पण मी या महिलांना आश्वस्त करतो की त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील.

हेही वाचा       –        अमित शाहांची शरद पवारांवर टीका, अजित पवार गटाचा आमदार नाराज

घरातील महिलांना घर सांभाळताना अनेक गोष्टींची गरज भासते. याबरोबरच त्यांना स्वखर्चासाठीही पैसे लागतात. त्यामुळेच महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, एवढी चांगली योजना सुरु केल्यानंतरही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत, अशी प्रतिक्रियाही अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच घटकातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच परराज्यातील ज्या महिला सून महाराष्ट्रात येतील, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या दिवशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button