breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

केंद्रीय कर्मचारी RSSच्या कार्यक्रमात जाऊ शकणार, ५८ वर्षांपूर्वी घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या कार्यक्रमात जाण्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांवर बंदी होती. ही बंदी तब्बल ५८ वर्षानंतर उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी देखील आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मिडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भातला सरकारी आदेश शेअर केला असून त्यावर सविस्तर पोस्टही लिहिली आहे.

केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. ३० नोव्हेंबर १९६६, २५ जुलै १९७० व २८ ऑक्टोबर १९८० या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे.

हेही वाचा     –      शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर..; अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर 

अमित मालवीय यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं आहे. ५८ वर्षांपूर्वी १९६६ मध्ये तत्कालीन सरकारने जारी केलेले कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणारे घटनाबाह्य आदेश मोदी सरकराने मागे घेतले आहेत. तेव्हा जारी करण्यात आलेला आदेशच मुळात चुकीचा होता. ७ नोव्हेंबर १९६६ रोजी संसद परिसरात गोहत्याविरोधी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात मोठ्या संख्येनं आरएसएस व जनसंघाचे समर्थक सहभागी झाले होते. त्यावेळी अनेकजण पोलसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघाच्या भीतीमुळेच इंदिरा गांधी यांनी ३० नोव्हेंबर १९६६ रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यापासून रोखलं होतं, असं अमित मालवीय यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button