breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला. अनेक माजी नगरसेवकांनी ‘दादां’चा हात सोडत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. याच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी आज मेळावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल तर त्यांना समजावून सांगा. कोण काही येऊन सांगत असेल तर यांना फार काही शहराबद्दल जिव्हाळा आहे असं नाही, अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड आहे. कुणाचं कुणावाचून नडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं काही करू नका. आपल्याच पक्षाकडे राहा, असं अजित पवार कार्यकर्त्यांना सांगितलं.

डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. काही जण दिवसा इकडे असतात रात्री तिकडे असतात, अशांनी तिकडे जायचे तर तिकडे जा, असं म्हणत अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – ‘महिलांचे अर्ज भरून घ्यायचे ते सरकारला द्यायचे नाहीत’; फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप

काही घडामोडी घडल्या, ज्याचा उल्लेख विलास लांडे यांनी केला. अनेकांना पद दिली, ताकद दिली. काही जण बाहेर चे होते त्यांच्यात वाद होऊ दिला नाही. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. काय घडलं, काय नाही या खोलात जात नाही, आम्ही अनादर करणारे लोक नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.

मी भेदभाव करणारा नेता नाही, विरोधकांना पण माहिती आहे, काल काही गोष्टी घडल्या, अडीच तास मीटिंग झाली. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकजण होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मावळमध्ये जास्त निधी दिला. यावर शेळके यांनी म्हटलं की तुम्ही सारखा हा उल्लेख करतायत. कुणाला दुखवायचं नाही. मी साहेबांचा अपमान केला नाही,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button