ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे वाहू लागल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण

मद्यधुंद पर्यटकांचा कहर, पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहतूक कोंडीला आमंत्रण देत

माळशेज घाट : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील निसर्ग सौदर्यांनी नटलेला माळशेज घाट आहे. दाट धुके, गर्द झाडी, झाडीतून पक्षांची किलबिल आकर्षित करत असते. पावसाळ्यात या घाटातून वाहणारे धबधबे पाहिल्यावर धरतीवरील स्वर्गाची अनुभती होते. यामुळे वर्षाविहारासाठी माळशेज घाट पर्यटकांना आकर्षित करत असते. परंतु या घाटात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा मद्याचा नशा घेत आहे. पर्यटकांनी नशेत केलेल्या प्रताप पाहिल्यावर अशा लोकांचे पर्यटनच बंद करा, असेच वक्तव्य करावे लागले. या घाटाची सुरक्षा रामभरोसे आहे.

मद्यधुंद पर्यटकांचा कहर
कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनासाठी मनाई हुकुम काढले आहे. परंतु त्यानंतरही काही पर्यटक हा आदेश धाब्यावर बसून येत असतात. त्या ठिकाणी धबधबा पाहणे आणि त्यात भिजण्याचा आनंद घेतात. परंतु काही पर्यटकांनी कहरच केला आहे. दारु पिऊन रस्त्यात धिंगाणा केला. मद्याच्या नशेत रस्त्यावर लोळण घेतली. हा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणी दरड कधी कोसळू शकतात. तसेच घाट असल्याने कधी कोणते वाहन येईल ही दिसत नाही. परंतु काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहतूक कोंडीला आमंत्रण देत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पोलीस कर्मचारीच नाही…
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे वाहू लागल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विकएंडला वर्षाविहारासाठी पर्यटक येतात. परंतु पर्यटक कोणतीही काळजी न घेता घाटात वावरत आहे. याठिकाणी महामार्गावरील पोलीस कर्मचारी नसल्यामुळे घाटातील सुरक्षा धोक्यात आहे. मद्यधुंद पर्यटकांमुळे घाटात एखादी दुर्घटना घडायची शक्यता नाकारता येत नाही.

माळशेज घाटात ओतूर पोलिसांकडून मढ गावाच्या पुढे नाकाबंदी केली आहे. पोलीस दारु पिऊन जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करतात. परंतु त्यानंतरही घाटात पर्यटकांनी घातलेला व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button