ताज्या घडामोडीमुंबई

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर

ग्राहक नसल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापारी, शेतकऱ्यांवर

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाली आहे. ८०० ते ९०० गाड्या या भाजीपाला मार्केटमध्ये आल्या आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. भाजीपाला भिजलेल्या स्वरूपात एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहे. नवी मुंबई शहरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशवंत भाजीपाला प्रचंड प्रमाणात खराब होऊ लागला आहेत.

भाजीपाला पडून, शेतकऱ्यांचं नुकसान
मुंबई, नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे एपीएमसी मार्केटकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. आधीचं भाज्यांचं नुकसान त्यात ग्राहक नसल्यामुळे व्यापारी वर्गात संपूर्ण भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपासून भाजी-पाल्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मात्र आज ८ ते १० रु किलो अशा कवडीमोल भावात भाजीपाला विकला जात आहे. विशेष म्हणजे भाजीपाला जागेवर पडून असल्याने तो सडण्याचं प्रमाण वाढ वाढलं आहे. भाजीपाला संपत नसल्याने व्यापाऱ्यांना माल फेकून देण्याची वेळ आली आहे. यात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्यांनाचं म्हणणं आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल पडून आहे. भाजीपाल्याची आवक होत आहे, मात्र ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक कमी होती, त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. आता सध्या सततच्या पावसात भाज्यांच्या गाड्यांची आवक वाढली आहे. पण भाजीपाल्याला उठाव नसल्याने पालेभाज्या खराब झाल्या आहेत. त्या व्यापाऱ्यांनी फेकून दिल्या आहेत. त्यात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका सुद्धा भाजी मार्केटला बसला आहे. बराचसा शेतमाल बाजारात पडून असल्याचं एपीएमसी भाजी मार्केटमधील चित्र आहे.

गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे सर्वच भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ८० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोने शंभरीपार केली असून, वाटाणा ३२० रुपये, शेवगा २२० रुपये किलोवर पोहचला आहे. यामुळे साहजिकच ग्राहकदेखील घटले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button