breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘क्यूआर कोड’द्वारे मालमत्ता विवरण; सर्वेक्षण अन् करआकारणी पद्धती जाहीर

पिंपरी :  शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून महापालिकेने सुरू केले आहे. यामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयोग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. त्याची नोटीस ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे दिली जाणार आहे.

त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मालमत्ता धारकांना मालमत्तेचा नकाशा, विवरण, मूल्यांकन, देय बिलाची रक्कम असा तपशील दिसेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाकडून इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी आणि वसुली केली जात आहे. त्यानुसार कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट कंपनीमार्फत ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. यात नवीन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा  –    ऋतुराज गायकवाडला भारतीय संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला; म्हणाला.. 

या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपद्धती निश्चित केली आहे. अशा इमारती, मोकळ्या जमिनींना सुलभ व सलग क्रमांक देण्यात येणार आहेत. सर्व मालमत्तांची अंतर्गत बिनचूक मोजमाप होणार आहे. मालमत्तेचे चटई क्षेत्र (कारपेट) घेण्यात येणार आहे. त्यावर २० टक्के बिल्टअप आकारले जाणार आहे.

विशेष नोटीसवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मालमत्ताधारकास मालमत्तेचे विवरण दिसेल. यानंतर मालमत्ता मालक, भोगवटादारांना लेखी व ऑनलाइन हरकत घेता येईल. त्यासाठी मोबाईलवर ओटीपी बेस सुविधा उपलब्ध आहे. त्याची माहिती मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली जाईल.

करविवरण पाहून आकारणी योग्य किंवा अयोग्य कराबाबतची खातरजमा करता येईल. हरकत दाखल झाल्यानंतर बाजू मांडण्यासाठी सुनावणी होईल. त्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांसह सहाय्यक मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुनावणीनंतर आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून करयोग्य मूल्य निश्चित केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button