breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभा व महापालिका निवडणुकीत भाजप व महायुतीला शंभर टक्के यश मिळणार!

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी वर्षपूर्तीनिमित्त व्यक्त केला विश्वास

पिंपरी : आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीला शंभर टक्के यश मिळवून देणे हेच माझे आणि पक्ष संघटनेचे ध्येय आहे. त्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद पाठीशी आहेत. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पित सैनिक असतो. त्यामुळे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शुक्रवारी केले.

शंकर जगताप यांच्या भाजप शहराध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीनिमित्त शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शंकर जगताप यांचा सत्कार करण्यात आला. मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. प्रतिभा लोखंडे, वसंत शेवडे, माणिकराव अहिरराव, ॲड . एस. बी. चांडक, अशोक ऊर्फ भाई सोनवणे या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचा पाया रचला. पक्ष वाढविताना शिस्तप्रिय पक्ष अशी प्रतिमा तयार केली, त्यांचा आज सत्कार करून शंकर जगताप यांनी या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार अमित गोरखे, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर नानी घुले, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, संतोष कलाटे, मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक महेश कुलकर्णी, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगेरी, संजय मंगोडेकर, शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाता पालांडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदिप नखाते, प्रसाद कस्पटे, योगेश चिंचवडे, नामदेव पवार, अजित कुलथे, नंदू भोगले, नंदू कदम, देवदत्त लांडे, गणेश बारणे, सचिन राऊत, दिपक नागरगोजे, दिपक भंडारी, सुरेश गादिया, मधुकर बच्चे, प्रीती कामतीकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विविध प्रकोष्ठ, युवा मोर्चा, सर्व मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

भाजपाचा शहराध्यक्ष ही अभिमानाची बाब…

शंकर जगताप म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष होणे ही कोणासाठीही अभिमानाची बाब वाटणारी आहे. पक्षाने एक वर्षापूर्वी माझ्यावर विश्वास दाखव शहराध्यक्षपदावर माझी निवड केली. पक्षाचा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मी आभारी आहे. आज या पदाला एक वर्ष पूर्ण होत असताना आज मला आनंद होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला रुजविण्यासाठी आणि पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आहे. त्या सर्वांच्या योगदानातून आज शहरात क्रमांक एकचा राजकीय पक्ष बनला आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या विश्वासाला कोठेही तडा न जाऊ देता पक्ष मार्गक्रमण करत आहे. आता काही महिन्यांतच आपणाला विधानसभा आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जायचे आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा आणि महायुतीला पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कष्ट घ्यावे. तसेच आज पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी मला आशिर्वाद दिलेले आहेत. या सर्वांच्या भेटीनंतर माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच नवीन ऊर्जा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button