breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pimpri Chinchwad | पुजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाचेही अपंगत्व प्रमाणपत्र

पिंपरी | आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यातच आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातून देखील २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित प्रमाणपत्राची नोंद या रूग्णालयात असल्याचे आढळून आले आहे.

पूजा खेडकरने वायसीएम रूग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले होते. २४ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या या प्रमाणपत्रात त्यांच्या डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्वाचं उल्लेख आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील राशन कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल सादर केलं होतं. याआधी त्या कमी दिसण्याच्या समस्येमुळे चर्चेत होत्या आणि आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र समोर आलं आहे.

हेही वाचा        –        भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं इचलकरंजीबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले.. 

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या बाबतीत केंद्र सरकारने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती त्यांच्या निवडणीच्या संबंधातील दावे आणि इतर तपशीलांची चौकशी करेल. त्यांच्या अनुचित वर्तनामुळे आणि मागण्यांमुळे त्यांनी पुणे जिल्ह्यातील कलेक्टरेटमध्ये अनेक तक्रारी निर्माण केल्या होत्या, ज्यामुळे त्यांची बदली झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button