breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पत्रकारांसाठी ‘वेल्फेअर बोर्ड’ : ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांच्या लढ्याला यश!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन : आमरण उपोषण मागे घेण्याची केली विनंती

मुंबई | राज्यातील पत्रकारांचे हक्कांसाठी व उन्नतीसाठी माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळाची (वेल्फेअर बोर्ड) स्थापना करावी, याबाबत गेल्या १० वर्षांपासून लढा देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार व मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘माई’च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विशेष दालनामध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले. तसेच, पत्रकारांच्या मागणीनुसार, कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याबाबत आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पत्रकारांसाठी महामंडळ बनवण्यासाठी येत्या आठवड्याभरात चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान, भाजपाचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे यांनीही शीतल करदेकर यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा केली.

हेही वाचा      –       ‘आम्ही एकमेकांचे दुष्मन नाही, आम्ही विरोधक झालोत’; अजित पवारांचं विधान

विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून शीतलताईंच्या तब्येतीची विचारपूस करुन काळजी घेण्याची विनंती केली तसेच माध्यमकर्मींसाठी महामंडळ व्हावे ही आमचीही इच्छा आहे आणि यासंदर्भात संदर्भात चर्चा करु असे आश्वासन दिले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आजाद मैदान येथे शीतलताई करदेकर यांची भेट घेऊन तब्येतीचे विचारपूस केली तसेच “पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असायला हवे ही रास्त मागणी असून त्यांनी माध्यमकर्मींसाठी उभारलेल्या लढ्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे’ असे जाहीर केले.

या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत, मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस, सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर, संस्थापक सदस्य शेखर धोंगडे, डाॅ अब्दुल कदीर, लक्ष्मिकांत घोणसे पाटील, सुनील कटेकर, प्रवीण वाघमारे, गणेश तळेकर, अनिल चासकर, पराग सारंग, भुपेश कुंभार, भूषण मांजरेकर, विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील, दीपक चिंदरकर, सुभाष डुबळे यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला बहीण मानतात, या बहिणीचे साकडे त्यांनी ऐकले. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. भविष्यात पत्रकारांवरील आणि सर्वसामान्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे आपले कार्य असेच सुरू राहील.

– शीतल करदेकर, संस्थापक, अध्यक्ष, मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button