‘१३ तारखेपर्यंत आरक्षण दिले नाही तर..’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that if the reservation is not given by 13th, they will clear the table](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Manoj-Jarange-Patil-2-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | कुणाचे काय सुरू आहे, मला माहिती नाही. सरकारने काय सांगितले, ठरवले मला माहिती नाही. आमचे ध्येय आम्ही ठरवून आहोत. १३ तारखेपर्यंत विश्वास ठेवेन. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, दिले नाही, तर मराठे सुपडा साफ करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हांला राजकारणात जायचे नाही. तो आमचा रस्त्ता नाही, हे जाहीरपणे सांगितले आहे. परंतु, तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्यापुढे पर्याय काय? आम्ही विधानसभेची तयारी का करू नये. आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण द्या. काही लोकांना आरक्षण टिकवायचे नाही.
हेही वाचा – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन
लक्ष्मण हाके आमचे विरोधक नाहीत. आमचे विरोधक भुजबळ आहेत. बोलायची कुवत नाही. राज्यातील एका ही ओबीसी बांधवांना दुखवले नाही. एकही धनगर नेत्याला बोललो नाही. त्यांना विरोधक मानले नाही. मानणार नाही. आम्ही धनगर, वंजारी बांधवांचे आरक्षण मानत नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो. तुम्ही १७०० उमेदवार उभे करा, आम्हाला काय करायचे? तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आणि कुणबी एकच आहे. आमचे हक्काचे आरक्षण द्या. सगेसोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.
वेगळा कोणता प्रवर्ग ओबीसीमधून? वेगळा प्रवर्ग कसा? मराठा समाजाचे आरक्षण ओबीसीमध्ये आहे. ५० टक्के वर द्या, खाली द्या म्हणायची गरज नाही. देश स्वतंत्र होण्यापूर्वी आरक्षण आहे. हे कायदेशीर आहे. तरीही आम्हांला आरक्षण नाही. आम्ही वेगळे काय मागत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलणार नाही. ज्यांचा सन्मान करतो, त्यांचा एक शब्द चुकला तर बोलू शकत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.