IND vs BAN सराव सामना किती वाजता सुरु होणार? सर्व डिटेल्स एका क्लिकवर..
![What time will the IND vs BAN practice match start?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/IND-vs-BAN-780x470.jpg)
IND vs BAN | आज १ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सराव सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आतापर्यंतचा विचार केला तर भारतीय संघाचा बांगलादेशवर वरचष्मा असून दोन्ही संघामध्ये चुरशीचे सामने रंगले आहेत.
जाणून घ्या आजच्या सामन्याबद्दलची माहिती :
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२४ चा सराव सामना शनिवार, १ जून रोजी होणार आहे.
हेही वाचा – महत्वाची बातमी! जून महिन्यात बदललेले ‘हे’ नियम
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल तर नाणेफेक संध्याकाळी ७.३० वाजता होईल.
टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सवर होणार आहेत. तसेच मोबाईलवर Disney + Hotstar वर लाइव्ह सामना पाहता येईल.