ताज्या घडामोडीपुणे
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
राष्ट्राय स्वाहा संस्थेच्यावतीने आयोजन, जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
![Swadhinata Veer, Savarkar, Jayanti, Sharad Ponkhe, Lectures, Rashtraya, Swaha, Organizing, Citizen,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/savar-780x470.jpg)
पुणेः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वतीने शरद पोंक्षे यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे टिळक रोड येथील स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.