अभिनयाची छाप पाडणाऱ्या ‘छाया कदम’ यांचा प्रेरणादायी प्रवास
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत मारली मजल
![Acting, impression, shadow, inspirational journey, international, film, festival,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/chaya-kadam-780x470.jpg)
मुंबई : फँड्री’, ‘सैराट’, झुंड, ‘रेडू’ ते ‘लापता लेडीज’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच छाया कदम या सध्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील खास भूमिकेमुळे चर्चेत आहेत. हिंदी चित्रपटामध्ये नावीन्यपूर्ण भूमिका साकारून त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी नाटकापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचला आहे.
छाया कदम यांन नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी विजय बोराडे (अमिताभ बच्चन) यांच्या पत्नीची (रंजना बोराडे) भूमिका साकारली होती. तसेच सध्या देशभरात दिग्दर्शिका आणि निर्माती किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात छाया कदम यांनी ‘मंजू माई’ ही व्यक्तीरेखा साकारली असून छाया कदम यांना देशभर प्रेम मिळत आहे.