‘दमदाटी करणाऱ्यांना विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी घरी करा’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याविरोधात प्रचारसभा घेताना त्यांना जाहीर इशारा दिला आहे. तू जर धमक्या दिल्या, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझी अशी जिरवीन, की पुन्हा तु्ला सतत अजित पवारच डोळ्यांसमोर दिसेल. तू माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्याचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? असा धमकीवजा इशाराच अजित पवारांनी लंकेंना दिला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते म्हणतात मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. आणि दमदाटीचं राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. आजच्या सभेत तर कुणीतरी त्यांचं भाषण चालू असतानाच समोरून म्हणाला, ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही.
हेही वाचा – ‘सनातन संस्था ही दहशतवादी संस्था’; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
आम्ही ती खपवून घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू. यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.