‘मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील’; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-17-4-780x470.jpg)
पुणे : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन करीत गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, स्व. खासदार बापट साहेब यांनी प्रचंड काम पुण्यामध्ये केलं आणि आता मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. प्रचंड मताने मोहोळ निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.
हेही वाचा – ‘मविआ, महायुती दोघं सारखीच, यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं’; मनोज जरांगे पाटील
पुण्याच्या विकासाच्या व्हीजनबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, पुण्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे हे मोदी सरकारमुळे आणि महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर म्हणून, देशातलं आयटी कॅपिटल म्हणून आणि देशातलं टेक्नॉलॉजी कॅपिटल म्हणून विकसित करायचं आहे.
पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांचे काय व्हीजन आहे? असा सवाल करत ते व्हीजन लेस, डायरेक्शन लेस आहेत. त्यांच्याकडे नेता, नीती आणि नियत नाही अशी टीकाही त्यांनी केली.