‘भ्रष्टाचारापेक्षा पुत्रपेम कधीही चांगलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल
![Supriya Sule said that filial piety is better than corruption](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Supriya-Sule-1-780x470.jpg)
पुणे | महाविकास आघाडीची पुण्याच्या मुळशी येथे सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पुत्रीप्रेम आणि पुत्रप्रेम हे म्हणतात, भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलामुलींवर प्रेम करणं कधीही चांगल आहे हो…, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही लढाई अदृश्य शक्ती विरोधात आहे. अनेक लोकांना फोन येतात. पण इथे जे बसलेले आहेत ते कुणाला घाबरत नाहीत म्हणून इथे आहेत. पण जे गेले त्यांचीदेखील काही चुकी नाही. त्यांच्यावरही दबाव आहे. ह्यावेळेस जरासं वेगळं वातावरण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने दुपटीने ताकद वाढवली आहे. शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचीच आहे. मिंदे बिंदे यांना मी मानतच नाही. आजच्या घडीला सर्वात लाडका मुख्यमंत्री मंत्री म्हूणन उद्धव ठाकरे यांचं नावं आहे, हे मी नाही सर्व्हे सांगतो.
हेही वाचा – सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या नवीन दर
ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून आमच्याशी लढून बघा. तुम्ही ४० पार म्हणताय आम्ही तर ४८ पार म्हणू. ह्या देशाचा कृषीमंत्री कोण आहे? त्याचं नावं मला सांगावं. त्याचं नावं अर्जुनकुमार मुंडा आहे, कुणाला माहिती आहे का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज जेलमध्ये आहेत आणि अशोक चव्हाण कुठे आहेत आज? अशोक चव्हाण आज माझ्यावर नाराज आहेत, त्यांनी परवा माझ्याविरोधात स्टेटमेंट केलं. अहो, तुम्हाला मी भ्रष्टाचारी नाही म्हणत. निर्मला सीतारामन ह्यांचं हे स्टेटमेंट आहे. दोघांवर आरोप केले होते. केजरीवाल जेलमध्ये आहेत तर अशोक चव्हाण हे बाहेर आहेत. केजरीवाल यांनी ऐकलं असतं तर ते पण आज बाहेर असते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माझ्यावर टीका करण्यासारखं काही नाही म्हणून ते आज माझ्या संसदरत्न पुरस्कारावर टीका करत आहेत. त्यांना माहिती आहे, ह्यावेळेस त्यांना लोकं मतदान करणार नाहीत, म्हणून आज ५ फेजमध्ये ते निवडणूका घेत आहेत. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन गोष्टींसाठी तुम्ही मला मतदान करा. जेव्हा शुभ संकेत असतात तेव्हा तुतारी वाजते. मी तीनवेळा खासदार झाले आणि माझं तीन नंबरचं बटन आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.