WPL चॅम्पियन बनल्यानंतर बंगळूरूच्या टीमवर पडला पैशांचा पाऊस!
RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कालचा दिवस फारच खास ठरला आहे. आरसीबीने रविवारी १६ वर्षाचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयपीएलच्या १६ सिझनमध्ये विराट कोहली जे करू शकला नाही ते स्मृती मंधानाने दुसऱ्याच सिझनमध्ये करून दाखवलं आहे. दरम्यान पहिल्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर स्मृती मंधानाच्या टीमवर पैशांचा पाऊस पडला आहे.
WPL च्या फायनल सामन्यात विजय मिळवल्यानंतर आरसीबीला ६ कोटी रूपयांचं बक्षीस मिळालं आहे. याशिवाय दिल्लीच्या टीमला ३ कोटी रूपये मिळाले आहेत. तसेच श्रेयंका पाटिल आणि एलिस पेरीला प्रत्येकी ५ लाख रुपये मिळाले आहेत.
हेही वाचा – महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २२ जागा? वाचा संपूर्ण यादी
याशिवाय यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू ठरली आहे. तिला ५ लाख रुपये मिळाले आहेत. तसेच श्रेयंकाला इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कारही मिळाला. त्यासाठी तिला ५ लाख रुपयेही मिळाले. अशा प्रकारे श्रेयंकाला एकूण १० लाख रुपये मिळाले आहेत.