Breaking-newsराष्ट्रिय
महिलांवरील बंदी आठशे वर्षांपासून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/women-em-5.jpg)
नवी दिल्ली – केरळातील शबरीमाला हे मंदिर आठशे वर्ष जुने आहे आणि त्या मंदिरात तेव्हापासून महिलांच्या प्रतिबंधाची प्रथा पाळली जात आहे. एका पर्वतावर असलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी साऱ्या देशातून भाविक येत असतात. वर्षातून केवळ 127 दिवसच हे मंदिर दर्शनासाठी खुले असते.
गेल्या आठशे वर्षांपासून या मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर देवासोम बोर्डाकडे आहे. त्यांनी या प्रथेच्या संबंधात कोर्टात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की बोर्डाने तेथे महिलांना हे निर्बंध घातलेले नाहींत तर गेली अनेक शतके महिलाच स्वत:हून हे निर्बंध पाळत आल्या आहेत.
केरळ सरकारने या प्रकरणावरून आपली भूमिका सातत्याने बदलली आहे. मात्र गेल्या जुलै महिन्यात केरळ सरकारने या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास आपला विरोध नसल्याची भूमिका मांडली होती.