Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना वडील एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू

मुंबई | शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केलं. हे भाषण ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर त्यांनी एक पोस्ट लिहीत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

सगळा प्रवास झरकन डोळ्यांसमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.

शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला.

हेही वाचा     –      गेट वेल सून उद्धव ठाकरे विरुद्ध गेट आऊट सून फडणवीस!

‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलंय.

महाअधिवेशनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीकांत शिंदे यांच्याही डोळ्यात पाणी आलं. आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसैनिकांचा आधार बनले. शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानलं. काहीही झाल्यावर सर्वप्रथम पोहचणारे शिवसैनिक म्हणजे शिंदे साहेब..मी त्यांनी कायम शिवसैनिकांमध्ये पाहिलंय, असं म्हणताना श्रीकांत शिंदेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचं पाहण्यास मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button