breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अकरा तासाच्या मिरवणुकीने पिंपरीत बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

पिंपरी – ढोल-ताशा दणदणाट, पथकांचे पारंपरिक वादन, सनई चौघडा यांसारख्या वाद्याच्या निनादात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा घोषणांनी परिसर बाप्पामय झाला होता. तब्बल अकरा तासाच्या मिरवणुकीनंतर 61 मंडळांनी बाप्पांचे पिंपरीत विसर्जन करण्यात आले.

लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी रविवारी (दि. 23) दुपारी साडेबारा वाजताच मिरवणुकीला सुरूवात झाली होती. गणेश मंडळांनी सजविलेल्या आकर्षक पुष्परथामध्ये गणराय विराजमान झाले होते. दुपारी साडेबारा वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. रात्री नऊपर्यंत ३३ मंडळांनी जोशपूर्ण वातावरणात मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला. त्यामध्ये कैलास मित्र मंडळ, सदानंद तरुण मंडळ, शिवशंकर मंडळ, विकास तरुण मंडळ, प्रेमप्रकाश मंडळ, संग्राम मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, सुपर मित्र मंडळ आदींचा समावेश होता.

महापालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागत कक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी फुलांची मुक्त उधळण केली. फेटाक्‍यांची आतषबाजी केली. विठ्ठल तरुण मंडळाच्या ढोल लेझीम संघाने खेळ सादर केले. मोरे पुष्प भंडार मंडळाने गणपती बाप्पांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट केली होती. अष्टविनायक मित्र मंडळाच्या महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत युवतींनी नृत्य केले. फेटे घालून तरुण-तरुणी सहभागी झाल्या.

मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि गणेश मंडळांच्या पारंपारिक पद्धतीमुळे शांततेत गणपतीचे विसर्जन झाले. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, रोट्रॅक्ट क्लब, संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button