breaking-newsक्रिडा
डॉ. सविता पांढरे यांना मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये सात पदके
मलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स २०१८ स्पर्धेमध्ये मुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये तब्बल सात पदके पटकावली. त्यात १५०० मीटर, ४ बाय ४०० मीटर रिले, ५००० मीटर चालणे या प्रकारांमध्ये रौप्य तर ८०० मीटर धावणे आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यांच्या या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळाली.