महाराष्ट्रात कोरोना वाढला! २४ तासांत ३७ रूग्णांची नोंद
Corona Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३७ नवे रूग्ण आढळले असून, यामध्ये मुंबईमध्ये १९ रूग्णांचा समावेश आहे. राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या १९४ झाली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ३७ नवे रूग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १९, पुणे ६, हिंगोली ३, रायगड व नवी मुंबईमध्ये प्रत्येकी २, ठाणे मनपा, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नागपूरमध्ये प्रत्येकी एक कोरोना रूग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे.
हेही वाचा – ‘अजितदादा ४८ च्या ४८ जागा निवडूण आणू शकतात’; जितेंद्र आव्हाडांचा टोला
राज्यामध्ये सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. राज्यामध्ये मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या १९४ इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये ८८, ठाणे ३०, पुणे २८, रायगड १९, सांगली ८, कोल्हापूर ४, छत्रपती संभाजी नगर, बीड, हिंगाेली प्रत्येकी ३, सातारा, नागपूर प्रत्येकी २, सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड व अमरावतीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सक्रिय आहे.