संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं काय बिनसलं? वाचा सविस्तर..
Sandeep Mheshwari vs Vivek Bindra : सोशल मीडियाचा जर तुम्ही वापर करत असाल, तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील भांडणाबाबत नक्कीच ऐकल असेल. पण, अनेकांना प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेसचे फाउंडर विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं हे भांडण कशावरून सुरू आहे? याबाबत अद्याप ही माहिती नाही.
या दोन मोटिवेशनल स्पीकर्समध्ये नेमका वाद काय?
एका कथित घोटाळ्यावरुन या दोन युट्युबर्समधील वाद सुरू झाला. ११ डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘मोठा घोटाळा’ उघड केल्याचा दावा केला. व्यवसाय शिकवण्याच्या नावाखाली काही लोक हजारो रुपयांचे कोर्सेस विकत आहेत, असे ते म्हणाले होते.
या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर, संदीप माहेश्वरी आणि #StopScamBusiness सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये दावा केला की, काही लोक माझ्या टीमवर व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव आणत आहेत. या पोस्टनंतर विवेक बिंद्रांनी एक पोस्ट करत संदीप माहेश्वरीला खुले आव्हान दिले.
हेही वाचा – अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
यानंतर विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी समोरासमोर आले. विवेक बिंद्राने आपल्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचा दावा संदीप माहेश्वरी यांनी केला. विवेक बिंद्रानेही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन संदीप माहेश्वरीवर अनेक आरोप केले. तसेच, येत्या काळात संदीप माहेश्वरीचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे प्रकरण इथेच थांबले नाही. त्यानंतर संदीप माहेश्वरीं एक व्हिडिओ अपलोड केला आणि या कथित घोटाळ्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आणि सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करण्याचे आवाहन केले. महेश्वरीने व्हिडिओमध्ये आरबीआयची काही परिपत्रके दाखवली आणि बिंद्राच्या योजनांना घोटाळा म्हटले.
दरम्यान, संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा हे दोघेही देशातील सुप्रसिद्ध YouTubers आहेत, ज्यांना करोडो लोक फॉलो करतात. दोघांच्या फॉलोअर्समध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.