कामगार विश्व: ग्रुपो ॲन्टोलीन कंपनीतील कामगारांना ‘विंटर गिफ्ट’
तब्बल १८ हजार रुपयांची मिळाली वेतनवाढ : स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटनेचा करार
![Kamgar Vishwa: 'Winter Gift' to the Workers of Grupo Antolin Company](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/swabhimani-shramik-kamagar-sanghatana-780x470.jpg)
पिंपरी : चाकण औद्योगिक वसाहातीमधील खराबवाडी येथील ग्रुपो अन्टोलीन प्रा. लि. कंपनीतील कमागारांना तब्बल १८ हजार रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. चाकण औद्योगिक पट्टयातील ही सर्वाधिक वेतनवाढ असून, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ करार झाला आहे.
पहिल्या वेतनवाढ करार संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर बिश्व रंजन मोहंती यांच्या उपस्थित वेतनवाढ करार करण्यात आला.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, युनिट अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष रवींद्र तेजम, सरचिटणीस महेंद्र कदम, खजिनदार भगवान शिंगोटे, सहचिटणीस शंकर मांडेकर, सदस्य, पंकज क्षीरसागर, ज्ञानेश्वर पाटील, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट बिश्व रंजन मोहंती, प्लांट हेड वेंकट पुगाल, एच.आर इंडिया हेड – सॅम्युअल, एच.आर. मॅनेजर दीपक खोत, एच.आर. असिस्टंस – नितीन थोरबोले, प्रोडक्शन हेड – हिमांशू सिसोदिया, क्यालिटी हेड – सूर्यनारायण यांनी सह्या केल्या.
यावेळी माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, उद्योजक महादेव येळवंडे, महिंद्रा लॉजिस्टिक माजी युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर, दत्तात्रय गवारे, रविंद्र भालेराव उपस्थित होते. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.
करारामध्ये कामगारांसाठी मिळालेले लाभ…
एकूण पगारवाढ :- १८००० /- ( आठरा हजार रुपये), कराराचा कालावधी:- ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२५ या तीन वर्षांचा राहील. मेडिक्लेम पॉलीसी:- कुटुंबासाठी २२५००० /- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई-वडील यांचा समावेश करण्यात येणार आहे. बफर १० लाख असेल. मृत्यू साहाय्य योजना: २५०००००/- (पंचवीस लाख) रुपये पॉलिसी कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार आहे. ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, पगारी सुट्या, मतदानाची सुट्टी, दिवाळी बोनस, मासिक हजेरी बक्षीस, वैयक्तिक कर्ज सुविधा/ उचल, कॅन्टीन सुविधा, बस सुविधा, पेट्रोल भत्ता, पगाराचा फरक अशा विविध बाबी करारात नमूद करण्यात आल्या आहेत.