रोहित, विराटने मागितली भारतीयांची माफी; व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
![Rohit, Virat apologize to Indians; The video went viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Rohit-Sharma-and-Virat-Kohli-780x470.jpg)
Rohit-Virat Emotional Video : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. हा पराभव कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, भारतीय संघातील खेळाडू आणि १४० कोटी भारतीयांचे मन दुखावून गेला. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विरोट कोहली भारतीय चाहत्यांची माफी मागताना दिसत आहेत. युट्युब चॅनेल ‘Cric7 Videos’ ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ वर एका दिवसात जवळपास 3.7 मिलियन व्युज झाले होते. इतर सोशल मीडिया प्रोफाइल देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
हेही वाचा – ‘छगन भुजबळांना भाजपाकडून ऑफर..’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
Watch Rohit Sharma emotional message for INDIAN 🇮🇳 fans after India Lost the WORLDCUP 🏆 FINAL against AUS 🇦🇺 #IndianCricket #T20WorldCup "VVS Laxman" Liar #IPLAuction #Yash19 Thanksgiving "Delete" Bihar "Ted Cruz"#Suriya #AnimalTrailer ABHISHEKpic.twitter.com/XD9oD7UyfS
— Virat Kohli (@IamViratt) November 23, 2023
नेमकं सत्य काय?
व्हायरल होणारा व्हिडीओ रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्या एका मुलाखतीतील आहे. हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी NTV Sports वर अपलोड करण्यात आला होता.
I really believe in the concept of, "you either win or you learn". We fought hard and gave it our all but one thing is for sure, next season we definitely will bounce back stronger than ever with our learnings from this season.
Take care. @RCBTweets #RCB #IPL2018 pic.twitter.com/b0QM9chRAN— Virat Kohli (@imVkohli) May 24, 2018
विराट कोहलीने त्याच्या X (ट्विटर) प्रोफाइलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळून आला. २०१८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने २४ मे २०१८ रोजी त्याच्या प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर केला होता. दोन्ही व्हिडिओ जुने आहेत आणि नुकत्याच झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाशी व्हिडिओंचा संबंधित नाही.