Pune : एसटीचा ब्रेक फेल, दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक
पुणे : पुण्यात एसटीचा भीषण अपघात झाला आहे. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून १०० फुट अंतर पुढे आल्यावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेतलं आहे.
सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास १०० फुट अंतर पुढे आल्यावर चालकाने वाहकाला सांगितले की, ब्रेक फेल झाला आहे. त्यावेळी बसमध्ये ३० प्रवासी होते. त्यावेळी सर्व प्रवासी घाबरले आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – FIFA World Cup 2026 : भारत विरूद्ध कतार यांच्यात आज सामना; कुठे पाहता येणार सामना?
बसमधील सर्व प्रवाशांना समजण्याच्या आतमध्ये पुढील दुचाकी ३ आणि २ चारचाकी अशा वाहनांना जोरात धडक दिली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून जखमींना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.