छंद-अंगलीला “तून बिरजू महाराजांना शिष्यांकडून नृत्यांजली
ब्रिजश्याम कलाकुंज संस्थेच्या वतीने निगडीत येथील गदिमा नाट्यगृहात " छंद- अंग लीला" कथ्थक नृत्याचे आयोजन
![Chand-Anglila, Birju Maharaj, from the disciples, Nrityanjali,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/nrutyanjali-1-780x470.jpg)
पिंपरी : पंडीत बिरजू महाराज यांच्या कन्या विदुषी ममता महाराज यांनी नृत्य सादरीकरणातून साकारलेली गांधारी आणि रोहिणी कुलकर्णी यांनी सादर केलेली झांशीच्या राणीचा जीवनपटाने रसिकांना खिळवून ठेवले. निमित्त होते ब्रिजश्याम कलाकुंज संस्थेच्या वतीने निगडीत येथील गदिमा नाट्यगृहात ” छंद- अंग लीला” कथ्थक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नाट्यकला अकादमीचा पुरस्कार विजेते पंडित नंदकिशोर कपोते, पंडित अनिता कुलकर्णी,पंडित अरविंद आझाद,भरत जंगम,प्रभा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भगवान कृष्ण आणि पंडित बिरजू महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ केला.
पंडित बिरजू महाराजांनी काही रचना अजरामर करून ठेवल्या आहेत त्याच कलाकृतीचे जतन करून “अंग-लीला”च्या माध्यमातून रसिकांसमोर आणत आहोत. त्यांच्याच रचना आम्ही सादर करून त्यांना एक नृत्यातून नृत्यांजली अर्पण करीत आहोत.असे मनोगत प. ममता महाराज यांनी व्यक्त केले.
सुरुवातीला गुरु वंदना नृत्याने सुरुवात झाला नंतर विद्यार्थ्यांनी त्रिताल, संगम, झपताल,ठुमरी,सरगम नृत्य सादर रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.
नृत्यांगना रोहिणी कुलकर्णी यांनी आपल्या खास नृत्य शैलीतून झांशीची राणीचा जीवनपट रसिकांसमोर उभा केला. तर ममता महाराज यांनी नृत्याला अभिनयाची जोड, उत्कृष्ट पदन्यास, बोलकी भावमुद्रा यातून गांधारीचे पात्र साकार केले. यामुळे रसिकांनी त्यांच्या या कलाकृतीला उभे राहून टाळ्यांची दाद दिली.
यावेळी सीमा मठ, नेहा शर्मा,पद्मिनी सोनवणे, शृती शिरोडकर,कात्यायनी माथुर,रीमा मोहिते,आध्या शुक्ला,अस्मिता अलाबाळ, ज्ञानदा गोरे,अवनी इनामदार,मंजुश्री शर्मा,तनवी माजगे,सुरवी मठ, किमया देशपांडे,पृथा सागावेकर, अत्रेयी केवुल मानसी परदेशी,आर्या श्रीमाली यांनी कलाकारांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप साकोरे यांनी मानले.