‘ड्रग्जमुफ्त महाराष्ट्र करण्याची सुरूवात मातोश्रीपासून करा’; नितेश राणे यांचं प्रत्युत्तर
![Nitesh Rane said that making Maharashtra drug-free should start from Matoshree](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Nitesh-Rane-780x470.jpg)
मुंबई : देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार करतात, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे म्हणाले, कोरोनानंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता. आता उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत ठाकरे गट नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा.
हेही वाचा – मुंबईतील प्रदूषणाबाबत अभिनेत्री केतकी माटेगावकरची पोस्ट; म्हणाली..
तुझ्यासारख्या चवन्नी लोकांनी शिवसेनेची ही अवस्था केली. आदित्य ठाकरे दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायण पूजेला जायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरेमध्येच उठून गेलेला. कुठल्या नशेत होता? तुझा मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफियासोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल, असं नितेश राणे म्हणाले.
ड्रगमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा. दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. बीएमसीचं टेंडर कोणाला द्यायचं ते सांगावं लागेल. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं नितेश राणे म्हणाले.