Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण! वाचा सविस्तर..

Reservation in Maharashtra : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. मराठा आंदोलकांनी बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदारांची घरे आणि कार्यालये जाळल्यानंतर ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा निषेध करत मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले.

राज्यभर मराठा समाज आरक्षणासाठी धडपड करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. तर कित्येक विद्यार्थी आरक्षणासाठी लढत आहेत. मात्र सकल मराठा समाजाची नेमकी मागणी काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळावे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षण कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून घ्यावा ही सर्वात मोठी मागणी मराठा समाजाची आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण आहे?

  • एससी : १३ टक्के
  • एसटी : ०७ टक्के
  • ओबीसी : १९ टक्के
  • विमुक्त + भटक्या जाती (४ प्रवर्ग) : ११ टक्के
  • एसबीसी अ : ०२ टक्के
  • एकूण आरक्षण : ५२ टक्के

हेही वाचा – ‘टाटा कंपनीतील कामगारांचे संघटन विलक्षण’; सुहास बहुलकर

महाराष्ट्रात एकूण ५२ टक्के आरक्षण दिले जात असले तरीसुद्धा आरक्षणाच्या यादीत EWS ला 10 टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात एकूण मिळून ६२ टक्के आरक्षण नोकरी व शिक्षणात दिले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकार किती टक्के आरक्षण देणार याकडे मराठा समाजासह सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या राज्यात किती टक्के आरक्षण आहे?

  1. हरियाणा आणि बिहार : एकूण ६० टक्के आरक्षण
  2. तेलंगणा : एकूण ५० टक्के आरक्षण
  3. गुजरात : एकूण ५९ टक्के आरक्षण
  4. तामिळनाडू : एकूण ६९ टक्के आरक्षण
  5. छत्तीसगड : एकूण ८२ टक्के आरक्षण
  6. मध्यप्रदेश : एकूण ७३ टक्के आरक्षण
  7. झारखंड : एकूण ५० टक्के आरक्षण
  8. राजस्थान : एकूण ६४ टक्के आरक्षण
  9. केरळ : एकूण ६० टक्के आरक्षण
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button