पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलक आक्रमक; वाहतूक ठप्प
![Maratha protestors aggressive on Navale Bridge in Pune; Traffic stopped](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Pune-1-780x470.jpg)
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखला आहे. नवले पुलाजवळ मराठा आंदोलकांनी टायरची जाळपोळ केला आहे. त्यामुळे नवले पुलाजवळील वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास ८-१० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा – प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती
#MarathaArakshan #MarathaProtest #Maratha #pune #Pune #marata https://t.co/7uWUsq0vFP pic.twitter.com/3ywl4aYS7i
— Harish Vastrakar (@VastrakarHarish) October 31, 2023
मराठा आरक्षणासाठी बाई वळण मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी नवले पूल परिसरात टायर जाळल्यामुळे मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्यास सूचना दिल्या आहेत.