Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
Pimpri-Chinchwad : मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर जाळले टायर
![Pimpri-Chinchwad Maratha protesters aggressive, burnt tires on road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/pimpri-chinchwad-3-780x470.jpg)
पिंपरी : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये सोमवारी रात्री १० च्या सुमारास आळंदी दिघी रोडवर टायर पेटवण्यात आली यामुळे काही काश वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा – सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
आळंदी- दिघी रोडवर टायर पेटवून मराठा आंदोलकांनी एक- मराठा लाख- मराठा च्या घोषणा देत रस्ता अडवला होता. काही काळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. मराठा आरक्षणा प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस सतर्क असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.