सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
![Assembly Speaker Rahul Narvekar's first reaction to Supreme Court directives](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Rahul-Narvekar-780x470.jpg)
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी विधानसभेच्या अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ जानेवारीआधी घ्या, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत अद्याप माझ्याकडे कोणतीही आदेशाची प्रत प्राप्त झाली नाही. त्यामुळे संबंधित आदेशात नेमकं काय म्हटलं आहे? हे बघितल्याशिवाय मी या संदर्भात काहीही बोलू शकणार नाही.
३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याच्या कालमर्यादेबाबत विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले, वेळमर्यादेबाबत तोंडी युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे आदेशात नेमकं काय लिहिलंय, ते बघितल्याशिवाय मी काहीही बोलू शकत नाही, आदेशाची प्रत बघितल्यानंतरच मी यावर बोलेल.