Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; उपचारासाठी नकार
![Manoj Jarange Patal's health deteriorated somewhat; Refusal of treatment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/manoj-jarange-patil-6-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांकडून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
हेही वाचा – ‘तरूणांनी आठवड्याला ७० तास काम करावे’; नारायण मुर्ती यांचा सल्ला
मनोज जरांगे यांनी सरकारला तसेच विरोधकांना विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केलीये. तसचं ओबीसीमधील काही जातींना कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय हे जाहीर करावं असंही आवाहन त्यांनी केलंय. तर उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.