बीड जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
![Two fatal accidents in Beed district, 10 dead](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Beed-accident-780x470.jpg)
मुंबई : खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे आष्टी फाटा (ता. आष्टी) येथे घडली. तर भरधाव रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. दोन्ही अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील अंभोरा ( ता. आष्टी ) हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ मालमोटार ( क्र. MH २१ X ८६०० ) हा धामणगाव ( ता. आष्टी ) कडून अहमदनगर दिशेने जात होता. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना रुगणवाहिका (क्र. MH-१६ Q ९५०७) ने मालमोटारील पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा – प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं निधन
#WATCH | Ten people have died in two different accidents in Maharashtra's Beed district.
Four people, including a doctor, died in a collision between an ambulance and a truck on its way from Dhamangaon village to the city.
In the second incident, six people died after a… pic.twitter.com/DRZOmvv9EN
— ANI (@ANI) October 26, 2023
तर दुसरा अपघात बुधवार (२६ ऑक्टोबर) पहाटे ६ वाजता मुंबईकडून बीडकडे येते असलेल्या सागर ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आष्टा फाटा (ता. आष्टी) येथे नजीक घडला.