‘जयंत पाटील आमच्याच संपर्कात’; अजित पवार गटातील मंत्र्याचा दावा
![Dharmarao Baba Atram said that Jayant Patil is in touch with us](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Jayant-Patil-2-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार गटातील १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार गटातील मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, आमच्याकडे सध्या ४५ आमदार आहेत. सध्या कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नाही. उलट त्यांच्याकडे असलेले आमदार आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटीलसह ते आठ आमदार अजित पवार गटात येतील.
हेही वाचा – ‘शरद पवार सुप्रिया सुळेंना हमासच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाठवतील’; भाजप नेत्यांचा खोचक टोला
आमच्या सर्व आमदार, मंत्र्यांची दर मंगळवारी बैठक असते. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते सगळे ४५ आमदार बैठकीला उपस्थित होते. आमच्या गटाचे आमदार नाराज आहे, यात काहीएक तथ्य नाही. मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळत आहे, असंही धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.