Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अवजड वाहनाखाली सापडून तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू ; मैत्रीण गंभीर जखमी

शिक्रापूर रस्त्याने जाताना अचानक दुचाकी घसरून खाली पडल्याने भरधाव अज्ञात वाहनाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्याची एकोणीस वर्षीय मैत्रीण गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी ( दि. 17 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेलपिंपळगाव ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील बाजार समितीच्या कार्यालयासमोर घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासहित घटनास्थळावरून पसार झाला.

आदित्य विश्वनाथ ठाकूर ( वय 21, सध्या रा. हिंजवडी, लक्ष्मीनगर, पुणे, मूळ रा. शिर्डी, म्हाळोबानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर,) असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्याची मैत्रीण तमन्ना मदेखा पठाण ( वय – 19 वर्षे, रा. हिंजवडी, पुणे, मूळ रा. करंजी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) ही गंभीर जखमी झाली आहे.

या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रुग्णवाहिकाचालक सादिक बनुमिया शेख ( वय – 40 वर्षे, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदित्य व तमन्ना हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. आदित्य हा तमन्ना हिला मोटार सायकलवर ( क्र. एम.एच.17, सी.ए. 9359 ) पाठीमागे बसवून सोमवारी ( दि. 17 ) शिर्डीहून अहमदनगर रस्त्याने शिक्रापूर मार्गे चाकण – शिक्रापूर रस्त्यावरून आपल्या गावी हिंजवडीकडे निघाला होता. त्यावेळी त्याची दुचाकी शेलपिंपळगाव ( ता. खेड ) गावच्या हद्दीत आली असता बाजार समितीच्या कार्यालयासमोर अचानक घसरून गाडी खाली पडली. त्याचवेळी शिक्रापूरकडून चाकणकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक आदित्य याच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तर तमन्ना रस्त्यावर खाली पडल्याने जखमी झाली. त्या दोघांना तातडीने चाकण येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता आदित्य याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर तमन्ना हिच्यावर तातडीचे उपचार सुरु आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम हरगुडे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button