Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करताय? या गोष्टींची काळजी घ्या..
![Considering taking an education loan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Education-Loan-780x470.jpg)
Education Loan : भारतासारख्या देशामध्ये आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो. अशावेळी अनेकांना Education Loan म्हणजेच शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करावं लागतं. मुलांना उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करता यावं यासाठी अनेक सरकारी तसचं खासगी बँकांकडून हे एज्युकेशन लोन दिलं जातं. मात्र शैक्षणिक लोन घेताना विद्यार्थी गोंधळात.अशावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहुयात.
- एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी विविध बँका किंवा लेंडर्स आणि त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या एज्युकेशन लोनची संपूर्ण माहिती करून घ्या.
हेही वाचा – भारतीय पुरूष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक!
- व्याजदरासोबतच इतर चार्जेस जसं की प्रोसेसिंग फी, फोरक्लोजर चार्जेस अशा विविध शुल्कांची माहिती करून घ्या.
- बँका किंवा इतर फायनान्स कंपन्यांकडून ठरवण्यात आलेले पात्रता निकष समजून घ्या.
- कर्जदाराचं वय, शैक्षणिक पात्रता, लोन प्लॅन अंतर्गत येणारे कोर्सेस आणि महाविद्यालयं यांच्या पात्रतेत तुम्ही बसत आहात का, हे तपासून घ्या.
- एज्युकेशन लोन किंवा शैक्षणिक कर्ज घेत असताना शिक्षणाच्या खर्चासाठी लागणार असेल तितकंच कर्ज घ्या. जास्त कर्ज घेणं टाळा.