ISRO लवकरच करणार गगनयान मोहिमेची मानवरहित फ्लाईट टेस्ट
![ISRO will soon conduct unmanned flight test of Gaganyaan mission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Gaganyaan-mission-780x470.jpg)
ISRO : भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इस्रो लवकरच या मोहिमेची मानवरहित फ्लाइट टेस्ट घेणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 या मोहिमेसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही चाचणी 25 किंवा 26 ऑक्टोबर रोजी पार पडू शकते. इस्रोने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. क्रू एस्केप सिस्टीमची ही चाचणी असणार आहे. म्हणजेच, या यानातून अंतराळवीर कशा प्रकारे बाहेर पडतील याची ही चाचणी असणार आहे. या चाचणीवेळी रॉकेटमध्ये मानव नसणार आहेत.
हेही वाचा – आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडची नवीन शहर कार्यकारिणी जाहिर
Mission Gaganyaan:
ISRO to commence unmanned flight tests for the Gaganyaan mission.Preparations for the Flight Test Vehicle Abort Mission-1 (TV-D1), which demonstrates the performance of the Crew Escape System, are underway.https://t.co/HSY0qfVDEH @indiannavy #Gaganyaan pic.twitter.com/XszSDEqs7w
— ISRO (@isro) October 7, 2023
या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवयुक्त अवकाशयान पाठवेल. मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर इस्रोची ही सगळ्यात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा देखील इस्रोची मदत करणार आहे.