शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा निधी वाढण्याची शक्यता

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना लवकरच केंद्र सरकारकडून गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. PM KISAN योजनेच्या निधीच्या रकमेत सरकार वाढ करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम ६ हजार रूपयांवरून ८ हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी ५ मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘सगळे पक्ष भाजपात विलीन करून..’; बच्चू कडू यांचं मोठं विधान
केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत १०,००० कोटी रुपयांची बचत केली आहे. योजनेतून अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकल्यामुळे ही बचत झाली आहे. त्यामध्ये सुमारे १.७२ कोटी अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती अहवालात आहे.





