२ हजारांच्या नोटा जमा करण्यास RBI कडून मुदतवाढ
![RBI extends deadline to deposit Rs 2000 notes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/2000-notes-780x470.jpg)
RBI : दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत आज संपणार होती. मात्र रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. २ हजारांच्या नोटा जमा करण्यास RBI ने ७ ऑक्टोंबरपर्यत मुदत वाढवली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला असून, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विद्यमान प्रणाली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – गणेशोत्सवात PMPML प्रशासनाला १९ कोटी रूपयांचे उत्पन्न
आरबीआयने यंदा १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.