‘२०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप आमदारांचं विधान
![Prasad Lad said that Devendra Fadnavis will become Chief Minister in 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/devendra-fadnavis-and-eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
प्रसाद लाड म्हणाले, २०२४ नाहीतर २०३४ पर्यंत देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार राहणार आहे. तसेच, २०२४ मध्ये राज्यातही भाजपाचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.
हेही वाचा – शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील १४ हजार शाळा बंद होणार
प्रसाद लाड यांच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद लाड भाजपा विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या नेत्याचं नाव लाड यांनी घेणं गैर नाही. त्यांच्या नेत्याचं नाव लाड यांनी घेणं गैर नाही. आम्हालाही वाटतं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. तर अजित पवार यांच्या गटाला ते मुख्यमंत्री होतील असं वाटतं, असं संजय शिरसाट म्हणाले.