‘प्रत्येक घरात बहीणीचं कल्याण बघणारा भाऊ नसतो’; सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान
![Supriya Sule said that not every family has a brother who looks after the welfare of a sister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Supriya-Sule-1-780x470.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे.
भाजपाकडून महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी सर्वात आधी निशिकांत दुबे उभे राहिले. यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला. महिला आरक्षणावर बोलण्यासाठी भाजपाकडून पुरुष मंडळींना सर्वात आधी संधी दिली जात आहे, असं अधीर रंजन म्हणाले.
यावरून गृहमंत्री अमित शाह यांनी अधीर रंजन चौधरी यांना टोला लगावला. मला अधीर रंजन चौधरी यांना विचारायचं आहे की, महिलांच्या मुद्द्यांवर फक्त महिलांनीच बोलावं का? महिलांच्या प्रश्नांवर पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी महिलांच्या हिताचा विचार करणं आणि त्यावर बोलणं ही या देशाची परंपरा आहे, असं अमित शाह म्हणाले.
हेही वाचा – गणपतीला २१ दुर्वांची जुडीच का वाहतात? जाणून घ्या यामागची रोमक कथा
#WATCH | Women's Reservation Bill | NCP MP Supriya Sule says, "Nishikant Dubey said that INDIA is on the side of people who ran women down and spoke derogatorily…There was a Head of the BJP in Maharashtra. He told me personally on record on television – "Supriya Sule ghar jaao,… pic.twitter.com/wfHWUlHz7q
— ANI (@ANI) September 20, 2023
अमित शाह यांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटतं. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं. महिला वर्गासाठी पुरुषही तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक पुरुषांनी महिला वर्गाला सक्षम केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. भारतात सर्वात आधी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण राबवलं. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.