सीएंकडून राळेगणसिद्धि आणि शहरातील विद्यार्थ्यांना अर्थ साक्षरतेचे धडे
![Ralegansiddhi from C.E. and economic literacy lessons to city students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Pune-780x470.jpg)
पिंपरी (प्रतिनिधी)
निगडी येथील दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट्स ऑफ़ इंडिया( आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता वाणिज्य शाखेतील करिअर समुपदेशनाचा राळेगणसिद्धि आणि पिं चिं शहरातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी दिले अर्थ साक्षरतेचे धडे.
पश्चिम भारतीय प्रादेशिक परिषदेचे करिअर कौंसिलिंग समिती अध्यक्ष सीए हृदयेश पंखानिया, अध्यक्ष सचिन बंसल, विकासाचे अध्यक्ष वैभव मोदी यांनी राळेगणसिद्धि मध्ये पद्मश्री अण्णा हजारे यांची भेटी घेतली. यावेळी हजारे म्हणाले कि,युवक हि देशाची मोठी शक्ती आहे. युवकांनी प्रत्येक क्षेत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजेत. कार्य करताना आपल्या चरित्रावर डाग लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजेत.
यावेळी पश्चिम भारतीय प्रादेशिक परिषदेचे करिअर कौंसिलिंग समिती अध्यक्ष सीए हृदयेश पंखानिया, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सचिन बंसल, सीए विद्यार्थी संघटना प्रमुख (विकासा) अध्यक्ष वैभव मोदी,प्राजक्ता चिंचोळकर,शिल्पा बाबेल,अरविंद भोसले,प्रतीक डुंबरे,सुशांत कारभारी,निखिल कुलकर्णी,यश कुवाड,आनंद बंग, प्रसाद देव,महेश खांडेकर,सिध्दार्थ शहा,ऋतुजा निलंगे, दिव्येश त्रिपाठी या सनदी लेखापालांनी विविध महाविद्यालयात जावून वाणिज्य क्षेत्रातील करियरची संधी या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी जवळ पास ८ हजार विद्यार्थ्यांनी या करिअर समुपदेशन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचा मुख्य उद्देश इयत्ता आठवी, त्यापुढील माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी/पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये सीए अभ्यासक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करून वाणिज्य शिक्षणाला चालना देणे असा हेतू असल्याची माहिती सीए इन्स्टिट्यूट पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष अध्यक्ष सीए सचिन बंसल यांनी दिली.
हेही वाचा – ‘शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे’; अजित पवार
सिटी प्राईड विद्यालय निगडी, ज्ञानदीप महाविद्यालय रूपीनगर, सीके गोयल महाविद्यालय दापोडी, नवमहाराष्ट्र स्कूल तळवडे, नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरी, न्यू पुणे स्कूल निगडी, प्रतिभा कॉलेज चिंचवड,प्रीतमप्रकाश विद्यालय भोसरी, गीतामाता स्कूल चिंचवड, एचए विद्यालय पिंपरी, जीटीआयएस स्कूल मोशी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची इंग्रजी स्कूल आकुर्डी, भारतीय जैन संघटनेचे कनिष्ठ विद्यालय पिंपरी, राजीव गांधी विद्यालय नेहरूनगर या विद्यालयात सीएंनी मार्गदर्शन केले.
करिअर इन अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर यूथ (CAFY) आणि सुपर मेगा करिअर समुपदेशन शीर्षकाचा कार्यक्रम प्रोग्राम पॅन इंडिया ज्याची खालील उद्दिष्टे आहेत: विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन, वाणिज्य शिक्षणाचा प्रचार,आर्थिक साक्षरता, अकाउंटन्सी म्युझियमची स्थापना कार्यक्रम आयोजनासाठी आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए सचिन बंसल,उपाध्यक्ष सीए पंकज पाटणी, सचिव सीए सारिका चोरडिया खजिनदार सीए शैलेश बोरे,सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष (विकासा) सीए वैभव मोदी, सीए विजयकुमार बामणे, सी ए सचिन ढेरंगे यांनी पुढाकार घेतला.