Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘OTT प्लॅटफॉर्म म्हणजे निव्वळ टाईमपास आहे’; हेमा मालिनी यांचं विधान चर्चेत

Hema Malini : OTT प्लॅटफॉर्मने मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. अनेक नवीन शो, सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. याला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूडला याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. दरम्यान, यावरून ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी OTT प्लॅटफॉर्म बाबत मोठं विधान केलं आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या, प्रेक्षकांना चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे फक्त टाईमपास म्हणून पाहिले जातात. मोठ्या पडद्यावरचे चित्रपट वेगळे असतात. त्याची आपल्याला सवय आहे. मी स्वतः मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं पसंत करते.

हेही वाचा – ‘देशभरातील १४ कोटी तरुणांना मिळणार रोजगार’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओटीटी आणि वेबसीरीज टाइमपाससाठी चांगल्या आहेत. पण, त्या किती वेगळ्या आहेत ते मी सांगू शकत नाही. म्हणूनच गदर 2, पठाण जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकले, तेव्हा ते सगळे हिट झाले. लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला आवडतात, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button