देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने हा कायापालट करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्टला ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी करतील. यासाठी अदाजे २४ हजार केटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाईल. त्यात रेल्वे स्थानकांवर प्रतीक्षाकक्ष, शौचालये, स्थानिक उत्पादन विक्री सुविधा, मोफत वाय फाय, एक स्टेशन एक उत्पादन, परिसर सुशोभीकरण, वाहतूक सुधारणा आदी कामे होणार आहेत.
हेही वाचा – राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडे वर का कारवाई नाही? राजू शेट्टी
आंध्र प्रदेशातील १८, आसाममधील ३२, बिहारमधील ५०, छत्तीसगढमधील ७, नवी दिल्लीतील ३, झारखंडमधील २०, कर्नाटकातील १३, केरळातील ५, मध्य प्रदेशमधील ३४, महाराष्ट्रातील ४४, मेघालय आणि नागालँडमधील प्रत्येकी १, ओडिशातील २५, पंजाबमधील २२, राजस्थानमधील ५५, तामिळनाडूतील १८, तेलंगणातील २१, त्रिपूरातील ३, जम्मू-काश्मीरमधील ५, पुडुचेरीमधील १, उत्तर प्रदेशातील ५५, उत्तराखंडमधील ३, पश्चिममधील बंगालमधील ३७ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.





