सौदीच्या ‘या’ निर्णयाने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार?
![A Saudi decision will increase petrol diesel prices](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Petrol-Diesel-Price-780x470.jpg)
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दरवाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल ८५ डॉलरच्या वर आणि डब्लूटीआय क्रूड ऑइल प्रति बॅरल ८० डॉलरच्या वर विकले जात आहे. शुक्रवारी डब्लूटीआय क्रूड ऑइलच्या दरात ०.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल ८१.७८ डॉलरच्या आसपास आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.२१ टक्क्यांची वाढ नोंदवली असून ते प्रति बॅरल ८५.३२ डॉलरवर आहे. या दर वाढीनंतर भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.
जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीही पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
हेही वाचा – ‘पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची माफी मागावी..’; प्रकाश आंबेडकर यांची मागणी
सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आजही दिल्ली, मुंबईसह देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या मंदावलेल्या किमतींना गती देण्यासाठी सौदी अरेबियाने या वर्षी जुलैपर्यंत तेल उत्पादनात दररोज १० लाख बॅरल कपात करण्याची घोषणा केली होती.