पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर
नवी दिल्ली : पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतीय प्रेमी सचिनसाठी सीमा ओलांडून आली आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तिची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सीमा आणि सचिनला कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अशातच त्यांना चित्रपटात काम मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम सीमा हैदरला भेटम्यासाठी तिच्या घरी पोहोचली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमा हैदरची ऑडिशन घेतली. या चित्रपटात सीमा हैदर भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा – ‘मनोरा’ आमदार निवासासाठी इतक्या कोटींचा खर्च करून मिळणार या सुविधा
‘टेलर मर्डर स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवला जात आहे. त्या चित्रपटात सीमा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी चित्रपट निर्मिते अमित जानी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल सीमाचे भगवी शाल देऊन स्वागत केले, त्यानंतर तिने अमित यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सीमा गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने एटीएसकडून तिची चौकशी केली जात होती. आता सीमा हैदर आणि चित्रपटाची टीम एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहे. एटीएसच्या अहवालानंतर सीमा चित्रपटाचे शुटिंग सुरू करेल, अशी माहिती मिळत आहे.